(म्हणे) ‘पंजाबमधील घटनांकडे आमचे बारीक लक्ष !’ – कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली

टोरंटो (कॅनडा) – आम्हाला पंजाबमधील घटनाक्रमाविषयी ठाऊक आहे. आम्ही त्याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही शीख समाजातील लोकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न चालू ठेवू, असे उत्तर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी कॅनडाच्या संसदेत दिले. तत्पूर्वी शीख खासदार इकविंदर गहीर यांनी म्हटले होते, ‘भारतातील पंजाबमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमध्ये असणारे कॅनडातील लोकांचे नातेवाईक, मित्र यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही.’

खासदार सोनिया सिद्धू यांनी ट्वीट करून म्हटले, ‘मला पंजाबमधून दूरभाष येत आहेत आणि त्यामुळे मी अतिशय चिंतेत आहे. मला आशा आहे की, ही स्थिती लवकरच निवळेल आणि कॅनडातील लोक त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा संपर्क साधू शकतील.’ वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार कॅनडामध्ये शिखांची लोकसंख्या ९ लाख ५० सहस्र आहे. ही देशाच्या लोकसंख्येत २.६ टक्के इतकी आहे.

कॅनडातील ओंटारियो येथे खलिस्तान्यांनी २४ मार्च या दिवशी म. गांधी यांच्या पुतळ्याचा अवमान करत त्याला हानी पोचवली होती.

संपादकीय भूमिका

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताऐवजी कॅनडामध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तान्यांकडून होणार्‍या आक्रमणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे !