पुणे – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणार्या महेश लटपटे या तरुणाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ८५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस्.आर्. नरवाडे यांनी हा निकाल दिला. याविषयी १४ वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून लटपटे याच्यावर रांजणगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. लटपटे याने मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. तेव्हा ती लटपटे याच्याबरोबर आढळून आली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी अधिवक्त्या भारती कदम यांनी पाहिले.
गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी ८ साक्षीदार पडताळले. त्यातील मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. मुलगी अल्पवयीन आहे, याची कल्पना असतांना आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद अधिवक्त्या कदम यांनी केला. दंडाच्या रकमेतील ७५ सहस्र रुपये मुलीला हानीभरपाई म्हणून देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.