रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान ! ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते.

(म्हणे) ‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !

भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना नियमावली घोषित

नव्या नियमावलीनुसार भारतात येणार्‍या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र समवेत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मुखपट्टी (मास्क) घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली !

मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे आत्मघाती स्फोटात १ पोलीस ठार

येथील ‘आय १०/४ सेक्टर’मध्ये पोलिसांनी तपासणीसाठी थांबवलेल्या टॅक्सीमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये १ पोलीस ठार झाला, तर ४ पोलिसांसह ६ जण घायाळ झाले.

प्रवाशांनी तक्रारी केल्यास वाढीव शुल्क आकारणार्‍या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करू ! – शंभूराज देसाई, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन मंत्री

प्रवाशांकडून संबंधित ट्रॅव्हल्स चालकांविरोधाच्या तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.

संयुक्त राष्ट्रांत म्यानमारमधील हिंसक कारवाया थांबवण्याविषयी ठराव संमत

म्यानमारमधील हिंसाचार त्वरित थांबवावा आणि म्यानमारच्या सैन्याने राष्ट्राध्यक्ष विन मिंट आणि आंग सान स्यू की यांच्यासह सर्व मनमानीपणे कह्यात घेतलेल्या कैद्यांची तात्काळ सुटका करावी, असे आवाहन या प्रस्तावामध्ये केले आहे.

गरिबांना विलंबाने शिधा पोचवणार्‍या कंत्राटदारांकडून ६ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल ! – रवींद्र चव्हाण, मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी ते बोलत होते.

बिहारमध्ये मुसलमान तरुणांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पोलिसांनी ५ मुसलमान तरुणांना घेतले कह्यात ! बजरंग दलाला तक्रार का नोंदववावी लागली ? पोलिसांनी स्वतःहून ती का नोंदवली नाही ?

माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची ५५ कोटी रुपयांची बेहिशोबी भूमी जप्त !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्वच संपत्ती जप्त करून अशांना आजन्म कारागृहात डांबल्यावरच देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल !