बिहारमध्ये मुसलमान तरुणांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पोलिसांनी ५ मुसलमान तरुणांना घेतले कह्यात !

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देताना मुसलमान तरुण

भोजपलपूर (बिहार) – येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात काही मुसलमान तरुण बॅडमिंटनचा सामना जिंकल्यानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. या वेळी पोलिसांनी घोषणा देणार्‍या ५ मुसलमान तरुणांना तात्काळ कह्यात घेतले.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. (बजरंग दलाला तक्रार का नोंदववावी लागली ? पोलिसांनी स्वतःहून ती का नोंदवली नाही ? – संपादक) जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तरुणांचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी यांची चौकशी करण्यात येणार आहे.