संयुक्त राष्ट्रांत म्यानमारमधील हिंसक कारवाया थांबवण्याविषयी ठराव संमत

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्र्र सुरक्षा परिषदेत म्यानमारमध्ये सैन्याकडून चालू असलेली हिंसा रोखण्याविषयी ठराव संमत करण्यात आला. या ठरावाच्या वेळी चीन, रशिया आणि भारत यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले.

१. प्रत्यक्षात ७४ वर्षांनंतर म्यानमारविषयीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र्र सुरक्षा परिषदेत आणला गेला. म्यानमारमधील हिंसाचार त्वरित थांबवावा आणि म्यानमारच्या सैन्याने राष्ट्राध्यक्ष विन मिंट आणि आंग सान स्यू की यांच्यासह सर्व मनमानीपणे कह्यात घेतलेल्या कैद्यांची तात्काळ सुटका करावी, असे आवाहन या प्रस्तावामध्ये केले आहे.

२. १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेतील १२ देशांनी या ठरावाला पाठिंबा दिला. त्याच वेळी भारत, चीन आणि रशियाने यापासून स्वतःला दूर केले.

३. रुचिरा कंबोज पुढे म्हणाल्या, ‘म्यानमारचा शेजारी देश या नात्याने म्यानमारमधील प्रश्‍न सोडवण्याच्या प्रगतीवर या ठरावाचा काय परिणाम होईल, याची आम्हाला अद्याप खात्री नाही. देशातील सर्व पक्षांनी हिंसाचार संपवून संवादाच्या मार्गावर परतावे, अशी आमची अपेक्षा आहे. म्यानमारच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी संयमाचा राजनयिक दृष्टीकोन स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असे भारताचे मत आहे.’

४. याआधी १९४८ मध्ये म्यानमारवर एकमेव ठराव आणण्यात आला होता, ज्यामध्ये या देशाला संयुक्त राष्ट्रात सदस्यत्व देण्याची शिफारस करण्यात आली होती.