इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे आत्मघाती स्फोटात १ पोलीस ठार

घटनास्थळ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील ‘आय १०/४ सेक्टर’मध्ये पोलिसांनी तपासणीसाठी थांबवलेल्या टॅक्सीमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये १ पोलीस ठार झाला, तर ४ पोलिसांसह ६ जण घायाळ झाले.

या टॅक्सीमध्ये एक पुरुष आणि एक महिला बसलेले होते. पोलिसांना या दोघांचा संशय आल्याने त्यांनी टॅक्सी थांबवली होती. त्यानंतर हे स्त्री आणि पुरुष टॅक्सीच्या बाहेर आले. थोड्या वेळाने पुरुष पुन्हा टॅक्सीत बसला आणि त्याने स्वतःच्या शरिरावर बांधलेल्या बाँबचा स्फोट घडवून आणला.