भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना नियमावली घोषित

नवी देहली – चीनमध्ये वाढलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येनंतर भारतात सतर्कता म्हणून केंद्रशासनाकडून भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली घोषित करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार भारतात येणार्‍या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र समवेत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मुखपट्टी (मास्क) घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्रशासनाकडून भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली – 

कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याला विमानतळावरच अलगीगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवेश केंद्रावर  प्रवाशांचे तापमान मोजले जाणार आहे. तसेच प्रवाशांची आर्टी-पीसीआर् चाचणीही करण्यात येणार आहे. या चाचणीतून १२ वर्षांखालील मुलांना सवलत देण्यात आली आहे. तसेच कोणताही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी किंवा कोरोना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे यात म्हटले आहे.