झारखंडमध्ये दिलदार अन्सारी याने दुसरी पत्नी असणार्‍या आदिवासी तरुणीची हत्या करून केले ५० तुकडे !

देहलीमध्ये आफताब पूनावाला याने श्रद्धा हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे केल्यानंतर आता दिलदार अन्सारी याच्याकडून अशाच प्रकारची घटना घडणे, हे धर्मांधांची विकृत मानसिकता स्पष्ट करते !

कोकणच्या विकासासाठी कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण लवकरच स्थापन करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मत्स्यव्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल ? यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तमिळनाडू आणि गुजरात यांच्या मत्स्यव्यवसाय धोरणाविषयी अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.

घाटकोपर येथील इमारतीला आग

घाटकोपर येथील पंतनगर भागातील ‘विश्वा ब्लॉक’ या इमारतीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भीषण आग लागली आणि इमारतीची दुरवस्था झाली.

बुद्धीप्रामाण्यवादी खरंच ʻबुद्धीप्रामाण्यवादीʼ आहेत का ?

‘त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे कर्नल पुरोहित यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशनाला भीम आर्मी, मुलनिवासी मुस्लिम मंच आदी संघटनांचा विरोध !

कर्नल पुरोहित यांच्या जीवनावरील पुस्तकाला विरोध करणारे ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला पुरस्कार देण्यास विरोध करत नाहीत !

आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची स्थापना !

या सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवता आणि संत यांना शिव्या देणारे कोणत्या तोंडाने मोर्चा काढतात ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मोर्चा तर ‘नॅनो’ झाला. विराट मोर्चा होईल, असे सांगितले होते. आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता; पण मोर्चा अपयशी ठरला, हे संख्येवरून दिसत आहे. त्यामुळे हा राजकीय मोर्चा होता.

वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठांकडून ठाणे बंद, फेरी काढून केला निषेध व्यक्त

शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठाणे बंदची हाक दिली होती.

मुंबई भाजपकडून ‘माफी मागो’ आंदोलन !

‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्षमा मागावी’, ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे ठिकठिकाणी रोष प्रकट करून निदर्शने केली.