उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ सारखा कायदा व्हायला हवा ! – चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुलींना बळजोरीने पळवून नेणे, अशा मुलींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी आपल्याकडे कोणताच कायदा नाही.

देशाला जगात पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवणे आवश्यक ! – डॉ. अनिल काकोडकर, अणूऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष

आपल्या देशात संशोधन करणार्‍या शिक्षणसंस्था चालू करण्यात आल्या आहेत. भविष्यात यात वृद्धी होण्याची आवश्यकता आहे.

महाविकास आघाडीकडून मोर्च्याद्वारे शक्तीप्रदर्शन

महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, तसेच बेरोजगारी आदी विविध प्रश्नांविषयी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला.

राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत.

गोवंशहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधात सकल हिंदु समाजाची ‘जनगर्जना’ !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोवंश हत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने चिंचवड स्थानक येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

रूपी सहकारी बँकेतील ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत !

रूपी सहकारी बँकेतील ठेवीदार आणि खातेदार यांनी त्यांच्या ५ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीसह (नो युवर कस्टमर) अर्ज करावेत.

चेतन पगारे आणि अमन जट यांना फाशीची शिक्षा !

जिल्ह्यातील बहुचर्चित बिपीन बाफना खून खटल्यातील मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना जिल्हा अन् सत्र न्यायाधीश अदिती कदम यांनी १६ डिसेंबर या दिवशी फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

अकोला येथे २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघी जणी मैत्रिणीच्या वाढदिवसाहून परत येत होत्या. त्या वेळी ओळखीच्या मुलाने त्यांना थांबवून चॉकलेट आणि शीतपेय यातून गुंगीचे औषध दिले अन् नंतर ५ ते ६ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

धर्मांधता जिंकली !

युरोपमधील लोकांवर ‘ते’ स्वतःची संस्कृती, परंपरा आणि कायदे थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे युरोपीय देशांमध्ये जे घडले, ती धोक्याची घंटा आहे. ‘स्वतःची हेकेखोर वृत्ती सोडण्यास सिद्ध नसलेल्या या समाजाचे काय करायचे ?’, याचे उत्तर जगभरातील समाज धुरिणांनी आणि राजकीय नेत्यांनी शोधायचे आहे.

असे प्रत्येक मुसलमान नेता का म्हणत नाही ?

अजमेर दर्ग्याचे प्रमुख उत्तराधिकारी हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना फटकारतांना ‘पाकिस्तानमधील मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमान अधिक सुरक्षित आणि चांगल्या स्थितीमध्ये आहेत’, असे म्हटले आहे.