झारखंडमध्ये दिलदार अन्सारी याने दुसरी पत्नी असणार्‍या आदिवासी तरुणीची हत्या करून केले ५० तुकडे !

कुत्रे मांसाचे तुकडे खात असल्यावरून उघड झाली घटना  

साहेबगंज (झारखंड) – येथे दिलदार अन्सारी याने त्याची पत्नी रिबिका पहाडीन हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ५० पेक्षा अधिक तुकडे करून ते पोत्यात भरून घरात ठेवले होते. काही तुकडे निर्जन ठिकाणी फेकले होते. हे तुकडे कुत्रे खात होते. त्यांना मानवी मांस खातांना लोकांनी पाहिले आणि ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर या हत्येची घटना उघड झाली. पोलिसांनी अन्सारी याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्या काही नातेवाइकांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी रिबिका पहाडीन हिच्या शरीराचे उर्वरित तुकडे गोळा केले आहेत; मात्र तिचे शीर अद्याप सापडलेले नाही. अन्सारी याने ‘इलेक्ट्रिक कटर’ने रिबिकाच्या मृतदेहाचे तुकडे केले.

रिबिका ही येथील आदिम पहारिया या आदिवासी समाजातील आहे. दिलदार हा विवाहित होता. त्याने १० दिवसांपूर्वीच रिबिकाशी विवाह केला होता. त्यानंतर त्यांच्यात भांडणे होऊ लागली होती.

संपादकीय भूमिका

देहलीमध्ये आफताब पूनावाला याने श्रद्धा हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे केल्यानंतर आता दिलदार अन्सारी याच्याकडून अशाच प्रकारची घटना घडणे, हे धर्मांधांची विकृत मानसिकता स्पष्ट करते ! याविषयी देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाही !