पुणे येथे कर्नल पुरोहित यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशनाला भीम आर्मी, मुलनिवासी मुस्लिम मंच आदी संघटनांचा विरोध !

पुणे – लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरील ‘लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला भीम आर्मी, बहुजन एकता मिशन आणि मुलनिवासी मुस्लिम मंच या संघटनांनी विरोध केला आहे. हा कार्यक्रम सर परशुराम महाविद्यालयामध्ये १८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता होणार आहे. या संघटनांच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड यांची भेट घेऊन ‘प्रकाशन कार्यक्रम रहित केला नाही, तर वातावरण खराब होण्याची चिन्हे आहेत, कार्यक्रम झाल्यास निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी निवेदनाद्वारे दिली आहे. भीम आर्मीचे दत्ता पोळ, मुस्लिम मंचचे अंजूम इनामदार, जुबेर हुसेन आदी या वेळी उपस्थित होते.

स्मिता मिश्रा यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर, डॉ. सत्यपाल सिंग, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयातील ‘लेडी रमाबाई हॉल’मध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे.

संपादकीय भूमिका 

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे हिंदूंच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे गदा का आणतात ?
  • कर्नल पुरोहित यांच्या जीवनावरील पुस्तकाला विरोध करणारे ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला पुरस्कार देण्यास विरोध करत नाहीत !