बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची नावे उघड करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी !

या गुन्ह्याची प्रत पोलीसदलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून मुलींची ओळख उघड करणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक निर्देशाचे आणि पोक्सो कायद्याचे उल्लंघन करणारे आहे.

हिंदूंनो, ‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी संघटित व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात न रहाता हिंदूंनी हा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन आंदोलन उभे करणे आवश्यक !

इंदापूर (जिल्हा पुणे) शहरातील अवैध पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्याची हिंदु राष्ट्र सेनेची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

उरण (जिल्हा रायगड) येथील वायू विद्युत केंद्रातील स्फोटात अभियंत्याचा मृत्यू !

येथील वायू विद्युत केंद्रात झालेल्या मोठ्या स्फोटात तीन कर्मचारी भाजले आहेत, तर अभियंता विवेक धुमाळे (वय ३५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. घायाळांना नवी मुंबईतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांकडून तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयात प्रविष्ट !

शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅप’ करून ते भाजपला पुरवले असल्याच्या, तसेच त्यांनी पुण्यातील कार्यकाळातही त्यांच्या पदाचा अपलाभ घेत अवैध ‘फोन टँपिंग’ केल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते.

धर्मपालन आणि संस्कृती यांचे पालन केल्यासच धर्मरक्षणासाठी प्रेरणा निर्माण होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचे पत्र देणार्‍यांवर कारवाई करा !

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना गलीच्छ भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे दिली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ९ ऑक्टोबर या दिवशी भाजपच्या वतीने मार्केट यार्डच्या समोर आंदोलन करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची कोल्हापूर विभागाची श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली !

दौडीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्शांवर गडकिल्ले संवर्धन आणि गडांवरील अतिक्रमण या संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. ‘गडकिल्ले पर्यटनस्थळ आहेत कि ऐतिहासिक ठिकाण ?’, ‘पन्हाळागडाचे पावित्र्य राखणार कोण ?’, ‘विशाळगडमुक्ती संग्राम’, अशा लिखाणाचा समावेश होता.

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

रस्ता रुंदीकरणात जाणारे मारुति मंदिर वाचवा ! – करंजे आणि खेड परिसरातील भाविक-नागरिक यांची मागणी

जुने वाहतूक परिवहन कार्यालय (आर्.टी.ओ. ऑफिस) ते वाढे फाटा या रस्त्यावर रुंदीकरणाचे काम चालू आहे. या रुंदीकरणात अडथळा ठरणारे ऐतिहासिक मारुति मंदिर विकासकाकडून हटवले जाणार आहे.