नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण
जंगलात कोण खत द्यायला जाते; परंतु तेथेही झाडांना भरपूर फुले आणि फळे येतच असतात. झाडाची वाढ ही निसर्गात सहज होणारी प्रक्रिया आहे. झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व खनिजे मातीत असतात; परंतु झाडांना ती थेट मातीतून घेता येत नाहीत.