चित्रपटावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तो प्रदर्शित केलेल्या दिनांकानंतर करणार सुनावणी !

या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे सर्वसाधारण जनतेला स्पष्ट व्हायला हवे !

खालच्या न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली !

बलात्कार हा केवळ पीडितेसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी निंदनीय आहे. अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांमध्ये विशेषकरून लैंगिक अत्याचारांमध्ये चिंताजनक वाढ होत असतांना न्यायालयांनी सुज्ञ कायदेशीर उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते.

ब्रिटनमध्ये ऋषी सुनक पंतप्रधान लिज ट्रस यांचा पराभव करतील ! – सर्वेक्षण

आता ब्रिटनधील ‘हुजूर पक्षा’ची (‘कन्झर्वेटिव्ह पार्टी’ची) नेतृत्वासाठी निवडणूक झाली, तर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक हे पंतप्रधान लिज ट्रस यांचा पराभव करतील, असे ‘यू गोव्ह’ या प्रसिद्ध जागतिक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ब्रिटनच्या संसदेच्या परिसरात मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना म्हणून साजरी झाली दिवाळी !

वेस्टमिंस्टर पॅलेसजवळील सभापतींच्या शासकीय कक्षामध्ये आयोजित दिवाळी कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते आणि इस्कॉनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

रशियाने युक्रेनमधील ३० टक्के विद्युत् प्रकल्प केले नष्ट ! – झेलेंस्की

रशियाने गेल्या ८ दिवसांमध्ये युक्रेनमधील ३० टक्के विद्युत् प्रकल्प नष्ट केले,त्यामुळे छोट्या शहरांपासून राजधानी कीवमधील मोठ्या इमारतींपर्यंत अनेकांचा विजपुरवठा खंडित झाला आहे.

एका अमेरिकी डॉलरसाठी मोजावे लागणार ८३ रुपये !

एका अमेरिकी डॉलरमागे ८३ भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय भांडवली बाजारात केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे हे अवमूल्यन झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत ३ ठिकाणी बाँबद्वारे आक्रमणाची धमकी !

अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, सहारा हॉटेल, तसेच जुहू पी.व्ही.आर्. अशा ३ ठिकाणी बाँबद्वारे आक्रमणाची अज्ञाताने धमकी दिली.

सतना (मध्यप्रदेश) येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने औषधाच्या ‘प्रिस्क्रिप्शन’वर ‘श्री हरि’ लिहिण्यास केला प्रारंभ !

सतना येथील सकारी रुग्णालयातील डॉक्टरनेऔषधाच्या चिठ्ठीमध्ये ‘श्री हरि’ लिहिण्यास प्रारंभ केला आहे. डॉ. सर्वेश सिंह असे ते लिहिणार्‍यांचे नाव आहे.

पाकिस्तानी आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास नकार !

चीन स्वतः मात्र त्याच्या देशात जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून मुसलमानांना इस्लामपासून दूर नेण्यासाठी शिबिरात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करत आहे !

देहलीमध्ये फटाक्यांची खरेदी-विक्री करणार्‍यावर बंदी

देहली राज्यामध्ये फटाक्यांची निर्मिती, संग्रह आणि विक्री करणार्‍यांना ५ सहस्र रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिली.