इंदापूर (जिल्हा पुणे) शहरातील अवैध पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्याची हिंदु राष्ट्र सेनेची मागणी !

इंदापूर (जिल्हा पुणे), ९ ऑक्टोबर (वार्ता.) – इंदापूरमध्ये पुण्यश्लोक श्री मालोजीराजे भोसले यांचे पवित्र समाधीस्थळ आहे. मागील कित्येक वर्षे हिंदु समाजाच्या भावना दुखावून या पवित्र भूमीत निष्पाप गोवंशियांची राजरोसपणे हत्या होत आहे. याला केवळ इंदापूर नगरपालिका उत्तरदायी असून धार्मिक भावना, श्रद्धा जोडलेल्या या पुण्यभूमीवर गोतस्करांचा हैदोस वाढला आहे. इंदापूर नगरपालिकेने लवकरात लवकर शहरातील सर्व अवैध पशूवधगृहे पुढील १५ दिवसांत उद्ध्वस्त करावीत, अन्यथा आम्ही इंदापूर नगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात जाऊन न्यायदेवतेकडे दाद मागू, अशी चेतावणी तुळजापूर येथील हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. दिनेश धनके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, इंदापूर पोलिसांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून येथील अवैध पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती. मागील ४ वर्षांत इंदापूर नगरपालिकेने आम्ही दिलेली निवेदने, केलेल्या पत्रव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ७ ऑक्टोबर या दिवशी इंदापूरमधील सर्व अवैध पशूवधगृहे भुईसपाट करण्यात जाणूनबुजून दिरंगाई करत असलेल्या इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता, विधी विभाग, इंदापूर नगरपालिका, कायदेशीर सल्लागार, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?