कोल्हापूर – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची कोल्हापूर विभागाची श्री दुर्गामाता दौड दसर्याच्या समाप्तीला उत्साहात पार पडली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या दौडीला प्रारंभ झाला. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे महाद्वार रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली. या दौडीचे नियोजन करण्यात कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री सुमेध पोवार, गणेश जाधव, अवधूत चौगुले, रोहित अतिग्रे, अनिकेत डवरी यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
विशेषया दौडीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्शांवर गडकिल्ले संवर्धन आणि गडांवरील अतिक्रमण या संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. ‘गडकिल्ले पर्यटनस्थळ आहेत कि ऐतिहासिक ठिकाण ?’, ‘पन्हाळागडाचे पावित्र्य राखणार कोण ?’, ‘विशाळगडमुक्ती संग्राम’, अशा लिखाणाचा समावेश होता. |