ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ होऊ नये, यासाठी कोतवडेवासीय राबवणार स्वाक्षरी मोहीम !

ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू आणि जागृत देवस्थान ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ला कदापि अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी समस्त कोतवडेवासियांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.

भाजपचे जमाल सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी !

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याने त्यांच्या कार्यालयात त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र प्राप्त झाले आहे.

धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोचलो आहोत ? – सर्वोच्च न्यायालय

लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता असलेल्या देशामध्ये द्वेषापायी करण्यात येणारी हिंसा अन् वक्तव्ये धक्कादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना नोंदवले.

पाकच्या निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांच्यावर ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी !

खान पंतप्रधानपदी असतांना त्यांना विदेशी अधिकार्‍यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंविषयीची त्यांनी निवडणूक आयोगाला वस्तूनिष्ठ माहिती पुरवली नाही, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

 भारत-रशिया यांच्यातील व्यापारात ५०० टक्क्यांची वाढ !

भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारामध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या ५ मासांच्या कालावधीत विक्रमी वाढ झाली. उभय देशांमध्ये तब्बल ५०० टक्क्यांनी झालेल्या व्यापार वृद्धीमुळे रशिया आता भारताचा ७ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार झाला आहे.

भारताच्या ‘अग्नी प्राईम’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण !

भारताने २१ ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील बालासोर येथून ‘अग्नी प्राईम’ नावाच्या परमाणू शस्त्रास्त्रे नेण्याची क्षमता असणार्‍या नव्या पिढीतील क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.

प्रेमळ, वैद्यकीय सेवा करण्याचे ध्येय असणारी आणि लहान वयातच मायेपासून अलिप्त राहून साधनेचा दृढ निर्धार करून साधना करणारी कु. वैदेही राजेंद्र शिंदे !

स्वातंत्र्य मिळालेल्या या राष्ट्राला आपल्याला आदर्श असे ईश्वरी राज्य बनवायचे आहे. त्यासाठी हा तुझा अन् माझा त्याग आहे. तुला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात भावजागृती झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा प्रसाद देऊन सन्मान करणे

सर्वसामान्य व्यक्ती आणि साधक यांच्या मनात थोडेसे काही केले, तरी ‘मी पुष्कळ करतो’, असे कर्तेपणाचे विचार असतात. त्यामुळे त्यांचा अहं जागृत रहातो.

२५.१०.२०२२ या दिवशी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !

‘ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मल-मूत्रविसर्जन, अभ्यंग (संपूर्ण शरिराला कोमट तेल लावून ते शरिरात जिरेपर्यंत मर्दन करणे), भोजन, खाणे-पिणे आणि कामविषयाचे सेवन ही कर्मे करू नयेत.

नरकासुराचा (भौमासुराचा) वध        

नरकासुराचा वध आश्विन शुक्ल चतुर्दशीला करून श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्या आणि देवता यांना नरकासुराच्या भयापासून मुक्त केले.