जांबसमर्थ (जालना) येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या देवघरातील मूर्ती चोरणार्‍या २ धर्मांध मुसलमानांना अटक !

शेख हुसेनला अटक करून त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेने ४ मूर्ती कह्यात घेतल्या. मुख्य आरोपी शेख जिलानी हा अद्याप पसार आहे. मूर्तीचोर आणि विकत घेणारा अशा दोघांना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अंनिसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड !

इस्लाममध्ये असलेल्या अंधश्रद्धा नसिरूद्दीन शाह यांना ठाऊक आहेत, तर त्या विरोधात ते आणि अंनिसवाले एकत्रित लढा का देत नाहीत ? केवळ हिंदूंच्या सण-उत्सव यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदुविरोधी मुखवटा उघड होतो !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा जाहीर कार्यक्रम रहित !

या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशा मागगण्या आम्ही राज्य सरकारकडे केल्या. त्यांस प्रतिसाद देत राज्य सरकारने हा कार्यक्रम रहित केला.

पोलाद क्षेत्र ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला गती देईल ! – पंतप्रधान

वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताकडे वाटचाल करण्याच्या उद्दिष्टांमध्ये पोलाद उद्योगाची वाढती भूमिका अधोरेखित करतांना मोदी म्हणाले की, सक्षम पोलाद क्षेत्र देशाला कणखर पायाभूत सुविधा क्षेत्राकडे नेत आहे.

आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

२६/११ या दिवशी मुंबईवर झालेले आतंकवादी आक्रमण कुणीही विसरू शकत नाही. हा आमच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. याच ठिकाणी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होत आहे. आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी सक्षम आहेत.

दिवाळीनिमित्त कोपर्डी हवेली (तालुका कराड) येथे प्रवचन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दिवाळी सणाचे महत्त्व’ तसेच ‘हलालमुक्त दिवाळी कशा पद्धतीने साजरी करावी ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ४० युवक-युवती ग्रामस्थ उपस्थित होते.

लाहोरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले !

लाहोर येथे २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी एका कार्यक्रमाच्या वेळी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले. या वेळी जमावाने खान यांना उद्देशून ‘घडी चोर’च्या घोषणाही दिल्या. या प्रसंगी खान स्वत: जमावाला बाजूला करत होते.

मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणाचे मुख्य कारस्थानी अद्यापही सुरक्षित !

मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे सडेतोड प्रतिपादन !

चीनला शह देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील ७५ प्रकल्पांचे केले लोकार्पण !

चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून भारताने ७५ प्रकल्प उभारले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या लडाख दौर्‍याच्या वेळी या प्रकल्पांचे लोकार्पण केले. २ सहस्र १८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत ४४ पूल, २८ रस्ते आणि २ ‘हेलिपॅड’ यांचा समावेश आहे.

पाकमध्ये १० वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून ८० वर्षांच्या मुसलमानाशी लावून दिले लग्न !

पाकमध्ये धर्मांध मुसलमान थेट हिंदु मुली, तरुणी आणि महिला यांचे थेट अपहरण करून त्यांच्याशी विवाह करतात, तर भारतात हिंदु तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून विवाह करून तिची फसवणूक करतात !