पी.एफ्.आय.च्या पनवेल येथील सचिवासह अन्य तिघांना अटक !

पनवेलमध्ये पी.एफ्.आय. संघटनेचा कापडी फलक लावून ते सभा घेत असल्याचे आतंकवादविरोधी पथकाला आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून अधिक तिकीटदर आकारणी करू नये !  

खासगी प्रवासी वाहनांनी दीपावलीच्या काळात प्रवाशांकडून अधिक भाडे आकारू नये. प्रवाशांकडून भाडे आकारतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निश्‍चित केलेल्या भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संभाजीनगर येथे युवा महोत्सवात सीतेच्या तोंडी ‘लावणी’ घातल्याने अभाविपने सादरीकरण बंद पाडले !

हिंदूंच्या देवतांचे विडंबन होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ सादरीकरण बंद करणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !

इंडोनेशियाची राजधानी जकार्तात लागलेल्या आगीत संपूर्ण मशीद कोसळली !

येथील ‘इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदी’च्या घुमटात १९ ऑक्टोबर या दिवशी भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, घुमटासह संपूर्ण मशीद कोसळली.

‘हुकूमशाही नाकारा’ : चीनसह जगभरात शी जिनपिंग यांच्याविरोधात अभूतपूर्व आंदोलन चालू !

 चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची सलग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याविरोधात चीनमध्ये आंदोलन चालू करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये हे आंदोलन पसरत आहे.

मध्यप्रदेशात अवैध फटाका गोदामात स्फोट; ३ ठार !

राज्याच्या मुरैना जिल्ह्यात फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की, ज्या इमारतीत फटाके बनवले जात होते, ती इमारत पूर्णपणे कोसळली.

कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी असल्याचे सांगितले आहे. कोरोनासंबंधी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समितीने बैठक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

बांगलादेशात हिंदु तरुणीने विवाहास नकार दिल्याने मुसलमान तरुणाकडून प्राणघातक आक्रमण

धर्मांध मुसलमानांची हिंसक वृत्ती ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी, मुसलमान संघटना आणि त्यांचे नेते कधीही बोलत नाहीत !

आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही !  

आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले.

मुंबई येथे ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त !

सणासुदीच्या काळात जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचे सोडून त्यात भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !