आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचे पत्र देणार्‍यांवर कारवाई करा !

भाजपच्या वतीने सोलापूर येथे आंदोलन

आमदार विजयकुमार देशमुख

सोलापूर – भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना गलीच्छ भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे दिली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ९ ऑक्टोबर या दिवशी भाजपच्या वतीने मार्केट यार्डच्या समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश साखरे, तसेच राजकुमार पाटील, प्रशांत फत्तेपुरकर, भैय्या बनसोडे, शोभा बनशेट्टी, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, वीरेश उंबरजे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.