देशातील दुसर्‍या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे जगन्नाथपुरी येथे उद्घाटन !

देशातील दुसर्‍या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन करण्यात आले.

न्यूझीलंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘व्हिसा’चे सहानुभूतीपूर्ण निराकरण करावे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

कोरोना काळानंतर न्यूझीलंडमध्ये परतू न शकणार्‍या  भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘व्हिसा’च्या सूत्राचे सहानुभूतीपूर्ण निराकरण करावे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.

हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला विरोध करू ! – महाराष्ट्र करणी सेना

हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला महाराष्ट्रात विरोध करू, अशी चेतावणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी दिली आहे.

(म्हणे) ‘राजराजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता !’  

कमल हसन स्वतःला हिंदु समजतात का ? हाच मुळात प्रश्न आहे ! तमिळनाडूतील अनेक जण स्वतःला हिंदु न समजता द्रविड समजत आहेत. त्यांना हिंदु शब्दाचा अर्थही ठाऊक नसल्याने ते अशा प्रकारे स्वतःची फसवणूक करून घेत आहेत !

अमेरिकेत ४ भारतियांची हत्या

३ दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ४ भारतियांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे.

हरियाणा शैक्षणिक बोर्ड विद्यार्थ्यांना शिकवणार वैदिक गणित !

आता अन्य भाजपशासित प्रदेशांनीही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वैदिक म्हणजेच प्राचीन गणिताचे धडे देऊन स्पर्धात्मक युगामध्ये यश संपादन करण्यासाठी साहाय्य करावे, असेच हिंदूंना वाटते !

उद्योजक मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला बिहारमधून अटक !

मिश्रा याने संपर्क करून रुग्णालय बाँबने उडवून देण्याची आणि अंबानी दांपत्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

…तर भारताची अर्थव्यवस्था आतंकवादाच्या हातात जाईल ! – दुर्गेश परूळकर

हलाल जिहादच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण होत आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशाचा वापर विघातक कृत्यांसाठी केला जात आहे.

काँग्रेसचे नेते उदित राज यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘चमचा’ असा उल्लेख

भाजपने उदित राज यांच्यावर टीका करतांना ‘उदित राज यांची आदिवासी विरोधी मानसिकता दिसून येते’, असे म्हटले आहे.

नागपूर येथील रा.स्व. संघाच्या मुख्यालयाला भारत मुक्ती मोर्चाकडून घेराव घालण्याचा प्रयत्न !  

RSS विरोधात केवळ हिंदुद्वेषापोटी जन्म घेतलेल्या ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने काढण्यात आलेले मोर्चे समाजात द्वेष पसरवण्याविना काही करत नाहीत !