‘नाटो’च्या सैन्याशी रशियाचा संघर्ष झाल्यावर जगावर मोठी अपत्ती ओढवेल !  – पुतिन यांची चेतावणी

कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या सैन्याशी ‘नाटो’च्या सैनिकांचा थेट संपर्क अथवा संघर्ष झाल्यास जगावर मोठी आपत्ती ओढवू शकते, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ दाखवण्यासाठी छापले गारुड्याचे व्यंगचित्र !

एकेकाळी पाश्‍चात्त्य राष्ट्रे भारताला ‘गारुड्यांचा देश’ म्हणून हिणवत. आता भारताने अशांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे !

(म्हणे) ‘हिंदूंना १ पत्नी आणि ३ प्रेयसी असतात; मात्र सन्मान कुणालाच नसतो, तर मुसलमानांनी २ विवाह केले, तरी दोघांचा सन्मान करतात !’  

विवाहित मुसलमान तरुण स्वतःचा धर्म लपवून हिंदूं तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक करतात, याविषयी शौकत अली गप्प का आहेत ?

तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात !

न्यायालयाने अशा मालिकांवर बंदी घालण्यासह अशा मालिकांना प्रमाणपत्र देणार्‍या संबंधित यंत्रणेवरही कारवाई करण्याचा आदेश दिला पाहिजे; म्हणजे अशा प्रकारच्या मालिका कुणी परत निर्माण करण्याचे आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचे धाडस होणार नाही !

 पाक जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक ! – जो बायडेन

जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असणार्‍या पाकिस्तानला शस्त्रांस्त्रांसाठी साहाय्य करणारी आणि ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ही म्हण सार्थ ठरवणारी अमेरिकाच जगासाठी खर्‍या अर्थाने धोकादायक आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

अरबी देश इस्लामी नियम नाकारत आहेत, तर भारत स्वीकारत आहे ! – तस्लिमा नसरीन

अरब देश हळूहळू इस्लामी नियम नाकारत आहेत; मात्र बिगर अरबी देश उदाहरणार्थ भारत इस्लामी नियम त्वरित स्वीकारत आहेत’, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केली आहे.

‘अमूल’ दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ !

आता अमूलचे दूध ६३ रुपये लिटर झाले आहे. साधारण ३ मासांपूर्वी म्हणजे १७ ऑगस्ट या दिवशी अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली होती.

देहलीमधील मदरशाच्या मौलवीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

मदरशांमध्ये अपप्रकार होत असल्यामुळे आता मुसलमान मुलांना मुख्य प्रवाहाचे शिक्षण देण्यासाठी मदरशांना ताळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?

राष्ट्रीय हरित लवादाकडून कर्नाटक सरकारला २ सहस्र ९०० कोटी रुपयांचा दंड

देशातील प्रत्येक राज्याची माहिती घेऊन अशा प्रकारचा दंड वसूल करून तो पर्यावरणाच्या रक्षणावर खर्च करण्यास प्रारंभ करण्यात आला, तर प्रशासनाला वचक बसेल !

कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिली अटक !

कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.