सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

माझ्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात ! – गोटाबाया राजपक्षे, राष्ट्रपती, श्रीलंका

गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, वर्ष २०२० मध्ये रासायनिक खतांच्या वापरावर घातलेल्या बंदीसाठी मला खेद आहे. या निर्णयामुळे देशातील धान्याचे उत्पादन पुष्कळ अल्प झाले. यामुळे नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. माझा हा निर्णय चुकीचा होता.

महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार असतांना मशिदींवरील भोंगे का हटवले नाहीत ? – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’

स्विडनमध्ये कुराण जाळल्यामुळे गेले ४ दिवस हिंसाचार चालूच !

स्वीडनच्या लोकसंख्या १ कोटी असून यात केवळ ३ लाख मुसलमान आहेत. तरीही देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार करून लोकांना वेठीस धरण्याचे धाडस ते करतात, ही संपूर्ण जगासाठी चिंतेची गोष्ट आहे !

कर्नाटकातील पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्न स्वामीजी यांचे परखड प्रश्‍न

सर्वांना समाजात शांतता आणि सौहार्दता हवी आहे; परंतु एकीकडून आमच्या उत्सवाला विरोध केला जातो. हा कोणता न्याय आहे ?, आमच्यावर इतके आघात होत असतांना ‘हिंदूंनीच सदैव नमते घ्यायचे’, अशी इच्छा बाळगणे, हा कोणता न्याय आहे ?

(म्हणे) ‘मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली, तर मंदिरासमोर बसून भोंग्यांवरून कुराण पठण करू !’

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदींसमोरून जात असतांना हिंदूंना त्यांच्या परंपरांचे पालन करू देण्यात का येत नाही ? ‘या मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमण का केली जातात ?’, याचे उत्तर खानम देतील का ?

(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! भारतात गेल्या काही दिवसांत धार्मिक हिंसाचार झाला, तो मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात झाला आहे आणि हेच सत्य आहे; मात्र पाकिस्तान कांगावा करत हिंदूंनाच दोषी ठरवत आहे, यातून पाक डावपेचात किती हुशार आहे, हे लक्षात येते !

चारधाम यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाची पडताळणी होणार !

संतांनी सांगितल्यानंतर निर्णय घेणार्‍या उत्तराखंड सरकारचे अभिनंदन ! हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र जिहादी आतंकवादी रचतात. हे लक्षात घेऊन सरकारने असामाजिक घटक यात्रेकरूंमध्ये मिसळून समाजविघातक कार्य करू नयेत, यासाठी स्वतःहून पावले उचलणे अपेक्षित आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगलेल्या स्थितीत आढळला !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हत्या होत असतांना केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?

बिहारमध्ये दारूबंदी असतांना दारू सहज उपलब्ध होते ! – केंद्रीय मंत्री पशुपती पारस

ज्या राज्यात दारूबंदी आहे, तेथे ती सहज उपलब्ध होते, हे जर केंद्रीय मंत्रीच सांगत असतील, तर राज्य सरकार काय करत आहे ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !