मशिदीत श्री सत्यनारायणाची पूजा घालतात का ? अजूनही हिंदूंनीच नमते घ्यायचे ?
शिवमोग्गा (कर्नाटक) – कोणत्याही काळात पालट कधी एकाच बाजूने होऊ शकत नाही. आमच्या गुरूंनी मुसलमानांना मठात आणून त्यांचे स्वागत केले; परंतु कोणत्याही मशिदीत कोणत्याही मठाधिशांना आमंत्रित करून एखादी श्री सत्यनारायण पूजा घालण्याचा किंवा हिंदूंचा सण साजरा करण्याचा प्रकार कुठेच घडला नाही. असे एकाच बाजूने कधीपर्यंत आणि का झुकत रहायचे ? आणखी किती नमते घ्यायचे ?, असे परखड प्रश्न पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न स्वामीजींनी उपस्थित केले. राज्याचे माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
स्वामीजी पुढे म्हणाले की,
१. सर्वांना समाजात शांतता आणि सौहार्दता हवी आहे; परंतु एकीकडून आमच्या उत्सवाला विरोध केला जातो. हा कोणता न्याय आहे ?, हे समजत नाही. आमच्यावर इतके आघात होत असतांना ‘हिंदूंनीच सदैव नमते घ्यायचे’, अशी इच्छा बाळगणे, हा कोणता न्याय आहे ?
२. दोन्हीकडून सहकार्य झाले, तरच देशात शांती प्रस्थापित होणे शक्य आहे. ‘शासनाचे भय राहिले नाही’, असे वाटते. हिंदूंना भय वाटावे, अशा घटना घडत आहेत. ‘त्या पुन्हा घडणार नाहीत’, अशी कार्यवाही शासनाने केली पाहिजे.
३. श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या उत्सवांच्या वेळी हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक झालेली पाहून पुष्कळ दुःख झाले. श्रीराम आणि हनुमान यांचा जन्म झालेल्या देशात असे घडत आहे. बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या उत्सवांवर आघात होणे योग्य नाही. अशा घटना घडत असतांना एकात्मतेविषयी बोलणे अर्थशून्य आहे. पुढील काळात असे विरोध होेऊ नयेत.