स्विडनमध्ये कुराण जाळल्यामुळे गेले ४ दिवस हिंसाचार चालूच !

सौदी अरेबियाकडून कुराण जाळल्याच्या घटनेचा विरोध

  • स्वीडनची लोकसंख्या १ कोटी असून यात केवळ ३ लाख मुसलमान आहेत. तरीही देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार करून लोकांना वेठीस धरण्याचे धाडस ते करतात, ही संपूर्ण जगासाठी चिंतेची गोष्ट आहे ! – संपादक
  • एका निष्कर्षानंतर पुढील काही वर्षांत येथील मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्के होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर असे झाले, तर स्विडनला इस्लामी देश करण्यासाठी हिंसक आंदोलन चालू झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक

रियाध (सौदी अरेबिया) – युरोपमधील स्विडन देशात कुराण जाळल्याच्या घटनेवरून गेल्या ४ दिवसांपासून शरणार्थी मुसलमानांकडून हिंसाचार चालू आहे. येथील अनेक शहरांत हा हिंसाचार चालू आहे. येथील स्ट्राम कुर्स या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कुराण जाळण्यात आले होते. या पक्षाचे अध्यक्ष रासमूस पालूदान यांनी यासाठी आवाहन केले होते.

कुराण जाळण्याच्या घटनेचा सौदी अरेबियाकडूनही विरोध करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व धर्म आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचा होणारा अवमान थांबवला पाहिजे. चर्चेद्वारे शांततेसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.