माझ्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात ! – गोटाबाया राजपक्षे, राष्ट्रपती, श्रीलंका

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना अंततः उपरती !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी अंततः देशाच्या सध्याच्या वाईट स्थितीला तेच उत्तरदायी आहेत, असे मंत्रीमंडळासमोर मान्य केले आहे. ‘मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे’, असे सांगत त्यांनी चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे. राजपक्षे यांनी त्यांच्या नवीन मंत्रीमंडळाची स्थापना केली आहे.

गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, वर्ष २०२० मध्ये रासायनिक खतांच्या वापरावर घातलेल्या बंदीसाठी मला खेद आहे. या निर्णयामुळे देशातील धान्याचे उत्पादन पुष्कळ अल्प झाले. यामुळे नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. माझा हा निर्णय चुकीचा होता. आता तो सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत.