नागपूर – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंगे हटवण्यासाठीची मोहीम चालू झाली आहे; मात्र हे भोंगे फार पूर्वीपासून आहेत. भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे; मात्र महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे राज्य असतांना भोंगे का हटवले गेले नाहीत ?, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगाडिया यांनी १९ एप्रिल या दिवशी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, ‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’
(सौजन्य : सौजन्य टीवी ९)
पाकव्याप्त काश्मीरमध्ये संघाच्या शाखा निर्माण करा !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘१५ वर्षांत अखंड भारत होईल’, असे म्हटले आहे. मी त्यांच्या विधानाचे स्वागत आणि समर्थन करतो; मात्र सत्तेमध्ये असतांना वचन दिले जाते. सत्ता आणि सेना असतांना काहीही करता येते. एका मासात काश्मिरी हिंदूंसाठी घरे उपलब्ध करून द्या. त्यांच्यासमवेत रहा. पाकव्याप्त काश्मीरमध्ये संघाच्या शाखा निर्माण करा. मी स्वतः शाखेत ‘नमस्ते सदा वत्सले’ म्हणायला येईन.
पोलिसांनी अहवाल दिला असेल, तर हिंदूंनी सतर्क असले पाहिजे !
पाकिस्तानमध्ये घुसा. मोहन भागवत यांनी स्वतः लढाऊ टँक घेऊन जावे. मी स्वतः ते स्वच्छ करीन. जिहाद्यांचे धाडस वाढले आहे. महागाई, शेतकरी आणि बेरोजगारी या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दंगली करण्याचा कट रचला गेला नाही ना ? कारण दंगली झाल्या, तर मुसलमान आणि हिंदू दोघेही मरतील. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी आणि दंगली भडकावण्यासाठी हे राजकीय षड्यंत्र तर नाही ना ? पोलिसांनी अहवाल दिला असेल, तर हिंदूंनी सतर्क असले पाहिजे.