तृणमूल काँग्रेसने हत्या केल्याचा भाजपचा आरोप
बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हत्या होत असतांना केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ? – संपादक
बीरभूम (बंगाल) – येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगलेल्या स्थितीत आढळला आहे. भाजपने या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आणि ती तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
West Bengal: BJP worker’s body found hanging from a tree in Birbhum, political situation tense as family, party alleges murderhttps://t.co/fdMuhlUXHC
— OpIndia.com (@OpIndia_com) April 19, 2022
काही गावकर्यांनी म्हटले, ‘या कार्यकर्त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला.’ या कार्यकर्त्याचे नाव पूर्णचंद्र नाग असे आहे. तो मजुरीचे काम करतो. त्याने भाजपचे सदस्यत्व घेतले होते; मात्र तो सक्रीय कार्यकर्ता नव्हता.