बिहारमध्ये दारूबंदी असतांना दारू सहज उपलब्ध होते ! – केंद्रीय मंत्री पशुपती पारस

  • ज्या राज्यात दारूबंदी आहे, तेथे ती सहज उपलब्ध होते, हे जर केंद्रीय मंत्रीच सांगत असतील, तर राज्य सरकार काय करत आहे ? असा प्रश्‍न उपस्थित होतो ! – संपादक
  • देशातील अनेक राज्यांत आज गोहत्याबंदी कायदाही आहे; मात्र तरीही गोहत्या होते, गोमांसाची तस्करीही होते. याला सरकार, प्रशासन आणि पोलीस हेच उत्तरदायी आहेत ! – संपादक
केंद्रीय मंत्री पशुपती पारस

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यात दारूची तस्करी होते आणि त्यामुळेच दारूचा मोठा साठा नियमितपणे जप्त केला जातो. राज्यात दारूची विक्री सर्रासपणे चालू आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, असा दावा केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती पारस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील दारूबंदीचे वास्तव अधोरेखित होत आहे.

पारस पुढे म्हणाले की, राज्यात अवैधरित्या दारूची उपलब्धता हेच दारू पिणार्‍या लोकांना अटक करण्याचे कारण आहे; मात्र भेसळयुक्त दारू बनवून विक्री करणार्‍या दारू माफियांवर पोलीस कारवाई करत आहे. ‘राज्यात दारू उपलब्ध नाही’, असे कुणीही म्हणू शकत नाही.

राज्यात अवैधरित्या दारू उपलब्ध होती आणि त्यामुळेच अनेकांना नियमितपणे पकडले जात होते. दारूबंदी कायदा राज्याच्या हिताचा आहे, याची जाणीव आहे; मात्र असे असतांनाही राज्यात दारूची अवैध विक्री होत आहे.