जिहादी आतंकवाद दाखवल्यावरून दक्षिण भारतीय अभिनेते विजय यांच्या चित्रपटावर कुवेतमध्ये बंदी

जिहादी आतंकवाद्यांचे खरे स्वरूप जगासमोर आल्यावर इस्लामी देशांना पोटशूळ का उठतो ? वस्तूस्थिती दाखवणार्‍या अशा चित्रपटांवर अरब देशांनी कितीही बंदी घातली, तरी जगाला सत्य काय आहे, ते ठाऊक झालेले आहे !

करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्याच्या फेरीवर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांनी केली होती पूर्वसिद्धता !

हिंदूंच्या मंदिरांत आणि घरांतील गच्चीवर कधी असा साठा सापडतो का ? किंवा त्यांच्यावरून अन्य धर्मियांवर आक्रमणे होतात, असे कधी ऐकले आहे का ?

आगरा येथील मशिदीबाहेरील रस्त्यावरील नमाजपठणाला हिंदु महासभेचा विरोध

उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेत आहेत. तरीही धर्मांध कायदाबाह्य आणि नियमबाह्य वर्तन करण्यास धजावतात, हे संतापजनक. अशांवर कठोर कारवाई करून वठणीवर आणणे आवश्यक !

दक्षिण देहलीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये मांस विक्रीची दुकाने बंद ठेवणार ! – महापौर मुकेश सूर्यन्

दक्षिण देहलीचे महापौर मुकेश सूर्यन् यांनी ‘चैत्र नवरात्रीमध्ये शहरात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाची कठोरपणे कार्यवाही करणार’, असे म्हटले आहे. ‘आम्हाला आलेल्या तक्रारींनंतर आम्ही हा आदेश दिला आहे.

न्यूयॉर्कमध्ये वृद्ध शीख व्यक्तीला अज्ञातांकडून मारहाण

अमेरिकेत शिखांवर होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार का ?

राष्ट्रपतीपद सोडण्यास गोटबया राजपक्षे यांचा नकार !

श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अराजकसदृश्य स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती गोटबया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. तसेच ‘संसदेत बहुमत सिद्ध करणार्‍या पक्षाला सत्ता सोपवण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड !

संजय राऊत यांची येथील १ सदनिका आणि रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड अशी एकूण ११ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे.

सेक्युलर व्यवस्थेचा उपयोग हिंदूंवर अन्याय करण्यासाठी ! – सौ. रूपा महाडिक

भारतीय राज्यव्यवस्था केवळ अल्पसंख्यांकांच्या हितासाठी कार्यरत असून सेक्युलर व्यवस्था ही एक खोटी म्हणजेच बनावट व्यवस्था बनली आहे. तिचा उपयोग फक्त हिंदूंवर अन्याय करण्यासाठी होत आहे !

सातारा येथे श्रीराम महायज्ञास प्रारंभ !

गुढीपाडव्याला म्हणजे २ एप्रिल या दिवशी या महायज्ञास प्रारंभ झाला असून श्रीरामनवमीपर्यंत म्हणजे १० एप्रिलपर्यंत हा चिमणपुरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत होणार आहे, अशी माहिती श्रीराम महायज्ञाचे निमंत्रक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली.

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणार आहे ! – चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

मेणवली (सातारा) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मेणवली यांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा आयोजित करण्यात आली होती.