नवी देहली – दक्षिण देहलीचे महापौर मुकेश सूर्यन् यांनी ‘चैत्र नवरात्रीमध्ये शहरात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाची कठोरपणे कार्यवाही करणार’, असे म्हटले आहे. ‘आम्हाला आलेल्या तक्रारींनंतर आम्ही हा आदेश दिला आहे. जर मांसच विकले जाणार नाही, तर लोक या काळात ते खाणारही नाहीत’, असेही त्यांनी म्हटले आहे.
साउथ दिल्ली में बंद रहेंगी मीट की दुकानें, मेयर मुकेश सूर्यन ने सुनाया फरमान https://t.co/vkinQgcZSI
— India TV (@indiatvnews) April 5, 2022
सूर्यन् म्हणाले की, नवरात्रीमध्ये उपवास करणार्यांना उघड्यावर पशूहत्या आणि मांस विक्री होत असल्याने त्रास होतो. याविषयी तक्रारी आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. येत्या ८ ते १० एप्रिल या काळात सर्व पशूवधगृहेही बंद ठेवण्यात येणार आहेत.