जिहादी आतंकवाद दाखवल्यावरून दक्षिण भारतीय अभिनेते विजय यांच्या चित्रपटावर कुवेतमध्ये बंदी

जिहादी आतंकवाद्यांचे खरे स्वरूप जगासमोर आल्यावर इस्लामी देशांना पोटशूळ का उठतो ? वस्तूस्थिती दाखवणार्‍या अशा चित्रपटांवर अरब देशांनी कितीही बंदी घातली, तरी जगाला सत्य काय आहे, ते ठाऊक झालेले आहे ! – संपादक

कुवेत सिटी (कुवेत) – दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते विजय यांच्या ‘बीस्ट’ (Beast) या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कुवेतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात जिहादी आतंकवाद दाखवण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. यात पाकिस्तान आणि आतंकवाद यांचा संबंध दाखवण्यात आला आहे.

ज्या चित्रपटांमध्ये अरब किंवा अन्य इस्लामी देशांना जिहादी आतंकवाद्यांचे ठिकाण म्हणून दाखवले जाते, त्या चित्रपटांवर या देशांमध्ये बंदी घातली जाते. कुवेतमध्ये मोठ्या संख्येने दक्षिण भारतीय कामगार काम करतात. यापूर्वी  दिकलेर सलमान यांचा ‘कुरूप’ आणि विष्णु विशाल यांच्या ‘एफ.आय.आर’ या चित्रपटांवरही कुवेतमध्ये बंदी घालण्यात आली होती.