मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ५ एप्रिल या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली. दादर येथील १ सदनिका आणि रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड अशी एकूण ११ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे.
मुंबईतील पत्राचाळ खरेदीतील १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. या व्यवहारातील पैशांतून संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर कारवाई ! – खासदार संजय राऊत
माझ्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आले. सरकार पाडण्यासाठी मी सहकार्य केले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारण आणि समाजकारण सोडेन अन् माझी उर्वरित सर्व संपत्ती भाजपच्या नावावर करीन. माझी संपत्ती कष्टाने कमवलेली आहे.
माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या राहत्या घरावर जप्ती आणली जाते, हे सूडाचं राजकारण आहे, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं?
सविस्तर वाचा : https://t.co/f25mgqe4MZ#SanjayRaut #Politics #CharchaTarHonarach pic.twitter.com/OGWWXL6kUj— Lokmat (@lokmat) April 5, 2022
या सूडाच्या राजकारणाला मी घाबरत नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. येणार्या दिवसांत सत्य बाहेर येईल.