करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्याच्या फेरीवर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांनी केली होती पूर्वसिद्धता !

  • काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांच्या धार्मिक स्थळांवरून हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर आक्रमणे होतात, याविषयी निधर्मीवादी कधी बोलणार ? – संपादक
  • हिंदूंच्या मंदिरांत आणि घरांतील गच्चीवर कधी असा साठा सापडतो का ? किंवा त्यांच्यावरून अन्य धर्मियांवर आक्रमणे होतात, असे कधी ऐकले आहे का ? – संपादक

करौली (राजस्थान) – येथे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदूंनी काढलेल्या दुचाकी फेरीवर मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले होते. या भागातील मशिदी आणि धर्मांधांच्या घरांवरील गच्ची येथे मोठ्या प्रमाणात दगड गोळा करून आक्रमणाची पूर्वसिद्धता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या आक्रमणाच्या प्रकरणी आतापर्यंत ४६ जणांना अटक केली आहे. स्थानिक काँग्रेस नगरसेवक मतलूब अहमद याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. येथे ७ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आलेली आहे.