कराड (जिल्हा सातारा) येथे ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन !

श्री दत्त चौकातील शिवतीर्थावर ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’ दिली.

पुणे येथे भारतीय गुरुकुल परिवाराच्या वतीने मे मध्ये बालक-पालक गुरुकुल शिबिराचे आयोजन !

महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृह, कर्वेनगर येथे वैद्य सुविनय दामले कृत ‘भारतीय गुरुकुल परिवार’ने ‘बालक-पालक गुरुकुल शिबिर क्रमांक ४’चे आयोजन केले आहे.

संभाजीनगर येथे खोट्या खरेदीखताद्वारे भूमीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तलाठी आणि मंडळ निरीक्षकासह ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्रशासनातील अधिकारीच अयोग्य कृती करत असतील, तर भ्रष्टाचार कसा थांबणार ? संबंधितांच्या विरोधात केवळ गुन्हा नोंदवून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

माढा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ‘ईडी’कडून चौकशी !

आतापर्यंत पिता पुत्राची ३ वेळा चौकशी झाली आहे. संपूर्ण प्रकरणात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ‘ईडी’कडे तक्रार केली होती.

‘प्रसाद योजने’अंतर्गत सोलापुरातील प्राचीन मंदिरांचा समावेश करावा !

सोलापूर जिल्हा हा आध्यात्मिक तीर्थस्थळांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु अद्याप सोलापुरातील एकही प्राचीन मंदिराचा समावेश या योजनेत नाही. त्यामुळे प्राचीन मंदिराच्या विकासासाठी प्रसाद योजनेत समावेश करावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे; मात्र महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदी कायम आहेत. देशातील सर्वपक्षांचे सरकार स्थापन करण्यात येणार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात सहभागी करण्यात येणार आहे.

हलाल मांसावर बहिष्कार घालून ‘झटका’ मांस खरेदी करणार्‍या हिंदु समाजाचे अभिनंदन ! – हिंदु जनजागृती समिती

यापुढे राज्य सरकारने हलालच्या नावाखाली चालणारी अमानुषता रोखण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्याचा नियम कठोरपणे लागू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.