सातारा येथे श्रीराम महायज्ञास प्रारंभ !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम् दक्षिणाम्नाय श्री शारदापीठम्, श्रृंगेरी आणि सातारा येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीराम महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याला म्हणजे २ एप्रिल या दिवशी या महायज्ञास प्रारंभ झाला असून श्रीरामनवमीपर्यंत म्हणजे १० एप्रिलपर्यंत हा चिमणपुरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत होणार आहे, अशी माहिती श्रीराम महायज्ञाचे निमंत्रक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली.

वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले, ‘‘यज्ञकाळात प्रतिदिन सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत शांतिसुक्त पठण, आवाहित देवतांचे पूजन, अग्निध्यान आणि श्रीरामनाम हवन होईल. सायंकाळी ४ वाजता भजन आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री ८ वाजता महाआरती होणार आहे. १० एप्रिल या दिवशी म्हणजे श्रीरामनवमीदिवशी श्रीरामनाम हवन, उत्तरांग हवन, बलीदान, यज्ञपूर्णाहुती होईल. श्रीराम जन्मकाळाच्या कीर्तनाने महायज्ञाची सांगता होईल. तरी समस्त रामभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.