आगरा येथील मशिदीबाहेरील रस्त्यावरील नमाजपठणाला हिंदु महासभेचा विरोध

उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेत आहेत. तरीही धर्मांध कायदाबाह्य आणि नियमबाह्य वर्तन करण्यास धजावतात, हे संतापजनक. अशांवर कठोर कारवाई करून वठणीवर आणणे आवश्यक ! – संपादक

आगरा (उत्तरप्रदेश) – आगरामधील इमलीवाली मशिदीच्या बाहेरील रस्त्यावरील नमाजपठणाच्या विरोधात हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. (वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणा स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक) हिंदु महासभेने ‘मशिदीच्या आत नमाजपठण करावे’, असे म्हटले आहे.

१. हिंदु महासभेचे जिल्हाप्रमुख रौनक ठाकूर यांनी सांगितले, ‘रस्त्यावर नमाजपठण करतांना येथील हिंदूंना त्यांची दुकाने बंद करण्यास सांगितले जाते. रस्ता बंद केल्याने रुग्णवाहिका येथून जाऊ शकत नाही. मुसलमानांनी रस्त्यावरील वाहतूक चालू ठेवली पाहिजे. नमाजपठणाला विरोध नाही; मात्र रस्ता चालू ठेवला गेला पाहिजे. जर याचे पालन केले जात नसेल, तर आम्ही विरोध करत राहू.’

२. हिंदु महासभेचे प्रवक्ते संजय जाट यांनी, ‘जर रस्त्यावर नमाजपठण केले जाऊ शकते, तर आम्हाला हनुमान चालीसाचे पठण करण्याची अनुमती का दिली जात नाही ?’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

३. पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी याविरोधाविषयी सांगितले की, वाद मिटवण्यात आला असून येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

४. मुसलमानांचे म्हणणे आहे की, गेल्या ४० वर्षांपासून मशिदीबाहेर नमाजपठण केले जात आहे. याला स्थानिक अधिकार्‍यांनी अनुमती दिलेली आहे. (जर एखादी चुकीची गोष्ट वर्षानुवर्षे चालू असेल, तर त्याला कधीच विरोध करू नये, असा नियम आहे का ? जर आता कुणी चुकीच्या कृतीला विरोध करत असेल, तर ती बंद केलीच पाहिजे ! – संपादक)