(म्हणे) ‘तुम्ही हिंदु, हिंदु, हिंदु करू नका, धर्माविषयी बोला !’

पत्रकारांशी चढ्या आवाजात बोलणारे मंत्री सामान्य जनतेशी कशा प्रकारे बोलत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असा प्रश्न अन्य पंथियांसंदर्भात विचारला असता, तर आव्हाड यांनी अशाच प्रकारे उत्तर दिले असते का ?  

कारागृहातील बंदीवानांना ५० सहस्रांपर्यंत कर्ज मिळणार !

कारागृहातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक बंदीवानांना कर्जपुरवठा करणार आहे. त्यानुसार बंदीवानांना ७ टक्के इतक्या माफक दराने कर्ज दिले जाईल.

पुणे येथे धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसमवेत वाहकाचे अश्लील कृत्य !

असुरक्षित पुणे ! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य करण्याचे धाडस करणाऱ्या वाहकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद !

एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आहे. त्यातच महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद रहातील. त्यामुळे ज्यांना बँकांच्या संदर्भात काही कामे करायची असल्यास ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत.

पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

संभाजीनगर येथे युवा सेनेच्या मेळाव्यातच १५ मिनिटे हाणामारी !

कार्यकर्त्यांनी हाणामारी करू नये, यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना नैतिकमूल्ये शिकवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

हलाल मांसाविषयी हिंदूंमध्ये जागृती हवीच !

हलाल मांस हा एक ‘आर्थिक जिहाद’ आहे. ‘हलाल मांसच वापरावे’, असे त्यांना (मुसलमानांना) जेव्हा वाटते, तेव्हा ‘ते वापरू नका’, असे सांगण्यात अयोग्य काय आहे ?, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केला.

काश्मीरचा फुटीरतावादी धर्मांध नेता बिट्टा कराटे याने २० काश्मिरी हिंदूंची हत्या केल्याची दिली होती स्वीकृती !

२० काश्मिरी हिंदूंची हत्या करूनही फुटीरतावादी धर्मांध नेता मोकाट फिरत असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि हिंदू यांना लज्जास्पद !

प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्रशासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा हिंदुविरोधी कायदा रहित करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ पासून १९९१ पर्यंत धार्मिक स्थळांविषयी न्यायालयांत जे खटले चालू असतील, ते सरळसरळ बंद करण्यात येणार आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.