नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडून मांस फेकले !

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये अशी तोडफोड कधी होत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘भारताने अनेक अडथळे आणल्यानंतरही ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची बैठक होत आहे !’ – पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

भारताने अडथळे आणले असते, तर ही बैठक होऊच शकली नसती, हे पाकने लक्षात ठेवायला हवे !

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार !

देहली आणि मुंबई या महानगरांमध्ये एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४९ रुपये ५० पैसे द्यावे लागतील. कोलकात्यात ९७६ रुपये, तर चेन्नईमध्ये हेच मूल्य ९६५ रुपये असेल.

पेट्रोल आणि डिझेल महागले !

ही वाढ १३७ दिवसांनी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी ११० रुपये ८२ पैसे, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ९५ रुपये मोजावे लागणार आहेत.

पुतिन युक्रेनवर रासायनिक आणि जैविक शस्त्रे यांद्वारे आक्रमण करू शकतात ! – बायडेन

अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर तूर्तास कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. ही कारवाई रोखण्यासाठी राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

स्वतःला निधर्मी म्हणवणारी काँग्रेस धर्मांतरबंदी कायद्याला विरोध करते, हे लक्षात घ्या ! यावरून काँग्रेसचा निधर्मीवाद किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते !

जगातील १०० सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये ६३ भारतीय शहरांचा समावेश !

या जागतिक सूचीत राजस्थानचे भिवाडी हे प्रथम, तर उत्तरप्रदेशातील गाझियाबाद द्वितीय क्रमांकावर आहे. देहलीचा क्रमांक चौथा आहे. सलग दुसर्‍या वर्षी सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून देहलीचे नाव समोर आले आहे.