व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट !

राजधानीत देहलीमध्ये आधी याची किंमत २ सहस्र २१९ रुपये होती, ती आता २ सहस्र २१ रुपये झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार !

देहली आणि मुंबई या महानगरांमध्ये एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४९ रुपये ५० पैसे द्यावे लागतील. कोलकात्यात ९७६ रुपये, तर चेन्नईमध्ये हेच मूल्य ९६५ रुपये असेल.

भोपाळ येथील रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत ४ मुलांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. स्वतःच्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा गोंधळ उडाला होता.

गॅस सिलिंडर घरपोच देणार्‍या कर्मचार्‍याने अतिरिक्त शुल्क मागितल्यास काय करावे ?

याखेरीज गॅस सिलिंडर पोच करणार्‍या कर्मचार्‍याविरुद्ध एच्.पी.सी.एल्. आस्थापनाकडे तक्रारही करता येऊ शकते. ही तक्रार करतांना अतिरिक्त शुल्क मागणार्‍या कर्मचार्‍याचे नाव, गॅस वितरकाचे नाव, शहराचे नाव, जिल्हा आदी नमूद करावे.

इंडियन ऑईल आस्थापन ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच पोचवणार

सरकारी आस्थापन इंडियन ऑईलने आता तात्काळ सेवा देण्याची योजना बनवली आहे. यानुसार ग्रहकांनी मागणी केल्यानंतर केवळ ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच देण्यात येणार आहे; मात्र यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला !

देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्‍या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.