शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सुपुर्द !

शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी : सर्वोच्च न्यायालयात १४ नोव्हेंबरला झालेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीवर सरन्यायाधिशांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधिशांच्या घटनापिठाने हा निर्णय घेतला. यातील ३ न्यायाधिशांच्या बहुमताने हे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शबरीमला आणि राफेल खरेदी प्रकरण यांवरील पुनर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार

शबरीमला आणि राफेल खरेदी या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकांवर उद्या १४ नोव्हेंबर या दिवशी निर्णय देण्यात येणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ हे निर्णय देणार आहे.

सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या ८ दिवसांत येणार ६ महत्त्वपूर्ण निकाल !

सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर या दिवशी निवृत्त होत असून त्याआधीच्या कामकाजाच्या ८ दिवसांत त्यांना सुनावणी घेऊन राखून ठेवलेले ६ महत्त्वाच्या प्रकरणांचे निकाल द्यावे लागणार आहेत. अयोध्येतील राममंदिराची उभारणी, शबरीमला मंदिरातील महिलांना प्रवेश, राफेलमधील कथित अपव्यवहार आदी महत्त्वाच्या निकालांचा अंतर्भाव …