जगातील १०० सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये ६३ भारतीय शहरांचा समावेश !

प्रदूषणावर ठोस उपाययोजना न काढता येणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

नवी देहली – जगातील १०० सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये भारतातील ६३ शहरांचा समावेश आहे. या जागतिक सूचीत राजस्थानचे भिवाडी हे प्रथम, तर उत्तरप्रदेशातील गाझियाबाद द्वितीय क्रमांकावर आहे. देहलीचा क्रमांक चौथा आहे. सलग दुसर्‍या वर्षी सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून देहलीचे नाव समोर आले आहे. पहिल्या १५ प्रदूषित शहरांमध्ये तब्बल १० शहरे ही भारतातील आहेत. हा अहवाल ‘आयक्यू एअर’ नावाच्या स्वित्झर्लंड येथील आस्थापनाने सिद्ध केला आहे.