(म्हणे) ‘भारताने अनेक अडथळे आणल्यानंतरही ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची बैठक होत आहे !’ – पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

भारताने अडथळे आणले असते, तर ही बैठक होऊच शकली नसती, हे पाकने लक्षात ठेवायला हवे !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘भारतासह पाकमधीलच आपल्या काही लोकांनी ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. भारताच्या जाळ्यात आपले लोक फसले आणि त्यांनी सांगितले, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही बैठक होऊ देणार नाही !’ त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे कोणत्या पक्षासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी होत आहे’, असे विधान पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केले.

‘भारताकडून अनेक अडथळे आणण्याच्या प्रयत्नांनंतरही ही बैठक होत आहे’, असेही ते म्हणाले. २२ आणि २३ मार्च या दिवशी या संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होत आहे.