घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार !

 

नवी देहली – ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे देहली आणि मुंबई या महानगरांमध्ये एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४९ रुपये ५० पैसे द्यावे लागतील. कोलकात्यात ९७६ रुपये, तर चेन्नईमध्ये हेच मूल्य ९६५ रुपये असेल.