मुंबई येथील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींविषयी निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री
शहरातील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या आणि अंशत: भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या इमारतींमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी १ समिती गठीत करून १ मासात निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत घोषित केले.