‘शिराळा युवक संघटनेचे संस्थापक’ आणि माजी सरपंच देवेंद्र पाटील यांच्याकडून ‘द काश्मीर फाइल्स’ची १०० तिकीटे विनामूल्य !

माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी सामाजिक माध्यमांसाठी सिद्ध केलेली पोस्ट

ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १४ मार्च (वार्ता.) – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अधिकाधिक हिंदूंना पहाता यावा यासाठी शिराळा युवक संघटनेचे संस्थापक आणि माजी सरपंच श्री. देवेंद्र पाटील यांनी या चित्रपटाची १०० तिकीटे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. या संदर्भात श्री. देवेंद्र पाटील म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंवर त्या काळात जे अत्याचार झाले, त्याची दाहकता लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे.

त्या काळात हिंदूंनी जे भोगले किमान यापुढील काळात तरी तशी वेळ येऊ नये यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय जाणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदूंनी जागृत होण्यासाठीच माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. हा चित्रपट आणखीन लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी प्रयत्नरत आहे. ‘हिंदवी स्वराज्य समुहा’चे अध्यक्ष श्री. शिवकुमार (सनी) आवटे यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी जे प्रयत्न केले. त्यातून प्रेरणा घेऊन हा विचार पुढे आला.’’