पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?
जालंधर (पंजाब) – येथे कबड्डीचा सामना चालू असतांना अज्ञातांनी एका खेळाडूची भर मैदानातच गोळ्या झाडून हत्या केली. संदीप नंगल असे या खेळाडूचे नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. संदीप नंगल यांना घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला.