पणजी – भाजपच्या विजयानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, माझ्या मतदारसंघात मी नसतांनाही कामे झाली. भलेही थोड्याशा मतांनी विजयी झालो असलो, तरी माझ्या जिंकण्याचे संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, तसेच माझ्या पक्षाला जाते. ‘डबल इंजिन’चे सरकार (राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असणे) परत येणार. आम्ही सत्तास्थापनेसाठी मगोप आणि विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांनाही समवेत सोबत घेणार आहोत.
#WATCH “The credit for this win goes to the party workers…BJP will form the govt in Goa,” says Goa CM Pramod Sawant#GoaElections2022 pic.twitter.com/dVGPvnNidh
— ANI (@ANI) March 10, 2022
उत्पल पर्रीकर यांचा पराभव
गोव्याची राजधानी पणजी येथील सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून सर्वांचे लक्ष लागलेल्या पणजी मतदारसंघात राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला. येथे भाजपचे उमेदवार आणि राज्याचे मंत्री बाबुश मोन्सेरात विजयी झाले आहेत. उत्पल पर्रीकर यांना भाजपने पणजीतून उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का; पणजीतून भाजपचे बाबुश मोन्सेरात विजयी https://t.co/HluknD9Rfh#UtpalParrikar #GoaElections2022 #BJP #BabushMonserrate
— Maharashtra Times (@mataonline) March 10, 2022