(म्हणे) ‘कट्टरतावादी हिंदु साधूची राजकीय शक्ती वाढली !’

योगी आदित्यनाथ यांच्या विजयामुळे आखाती देशातील ‘अल्-जजीरा’ वृत्तवाहिनीला पोटशूळ !

  • हा ‘अल्-जजीरा’ वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष होय ! लोकनियुक्त नेत्याला अशा प्रकारे हीन लेखणे, हा लोकशाहीचा अवमान नव्हे का ? लोकशाहीप्रेमी याविषयी गप्प का ? अशा विद्वेषी वृत्तवाहिनीवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! – संपादक
  • अशा हिंदुद्वेषी वृत्तवाहिनीला हिंदुत्वनिष्ठांचा विजय झाल्याचे पहावत नाही, यात काय आश्‍चर्य ! – – संपादक

दोहा (कत्तार) – उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठा विजय मिळाल्याने हिंदुद्वेष्ट्या आखाती देशातील ‘अल्-जजीरा’ या वृत्तवाहिनीला पोटशूळ उठला आहे. वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर ‘कट्टरतावादी हिंदु साधूची राजकीय शक्ती वाढली’ या मथळ्याखाली हिंदुविरोधी लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

लेखात म्हटले आहे की,

१. उत्तरप्रदेशच्या निकालामुळे वर्ष २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्यांच्या राजकीय संन्यासानंतर योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधानपद दिले जाईल, अशी चर्चा आहे.

२. असे असले, तरी ‘योगी आदित्यनाथ हे विघटनवादी नेते आहेत’, असे अनेक राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. (अशा राजकीय विश्‍लेषकांची नावेही घोषित करायला हवीत, अन्यथा राजकीय विश्‍लेषकांच्या नावाखाली स्वतःचा हिंदुद्वेषा कंड शमवण्याचाच  हा प्रकार म्हणावा लागेल ! – संपादक)

३. योगी आदित्यनाथ यांचे एकेकाळी खासगी हिंदु सैन्य होते. त्यांच्या सत्ताकाळात उत्तरप्रदेशात विविध आरोप असलेले १५० गुंड आणि गुन्हेगार यांना ठार करण्यात आले. त्यामुळे एकीकडे त्यांच्यावर टीका करण्यात आली, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाला अनेक मतेही मिळाली.

४. उत्तरप्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेले मुसलमान अल्पसंख्यांक हे योगी आदित्यनाथ यांना भाजपच्या ‘हिंदु फर्स्ट’ या धोरणाचा तोंडावळा समजतात. यामुळे राज्यात हिंदू आणि मुसलमान समाजांमध्ये वेळोवेळी तणाव निर्माण झाला आहे. (उत्तरप्रदेशातील  अल्पसंख्यांकांना एकीकडे ‘मोठ्या प्रमाणात’ आणि दुसरीकडे ‘अल्पसंख्यांक’ म्हणणे, यातून ‘अल्-जजीरा’ वृत्तवाहिनीची बौद्धिक दिवाळखोरीच स्पष्ट होते. वस्तूनिष्ठपणे पाहिल्यासही उत्तरप्रदेशात तब्बल २० टक्के जनता ही मुसलमान असतांना त्यांना ‘अल्पसंख्य’ म्हणणे हास्यास्पद नव्हे का ? – संपादक)