डोनाल्ड ट्रम्प पुतिन यांना घाबरत होते ! – ट्रम्प यांच्या माजी महिला सहकार्‍याचा दावा

ट्रम्प यांच्या माजी सहकारी स्टेफनी ग्रिशम (डावीकडे) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हुकूमशहा फार आवडतात. कुणालाही, विशेषतः पत्रकारांना ठार मारणारी माणसे त्यांना आवडतात. अशी क्षमता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये असल्यामुळे ते ट्रम्प यांना आवडतात, असा दावा ट्रम्प यांच्या माजी सहकारी स्टेफनी ग्रिशम यांनी केला. स्टेफनी या ट्रम्प यांच्या कार्यकाळात ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव होत्या.

‘जर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असतांना पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले असते, तर त्यांनी काय भूमिका घेतली असती ?’ असे स्टेफनी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ट्रम्प यांनी या भानगडीत स्वत: न पडता पुतिन यांना युक्रेनवर आक्रमण करू दिले असते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्या जागी जर ट्रम्प असते, तर ते ५७ फूट खोल बिळात जाऊन लपले असते.